उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई

Wed 16-Oct-2024,06:30 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श 

  

 दि 16-10-2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार नरेंद्र डहाके ,पोलीस शिपाई आकाश कांबळे, राकेश इतवारे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी (1) मिथुन अशोक राऊत , वय 29 वर्ष, रा. संत गोमाजी वॉर्ड, हिंगणघाट हा आरोपी क्र (2) रमेश शेंदरे, रा. संत गोमाजी वॉर्ड, हिंगणघाट याचा सांगणे वरून त्याच्या ताब्यातील बिना क्रमांकाचा हिरवा रंगाच्या जॉन धिरे 5050 ट्रॅक्टर मध्ये वना नदीच्या पात्राचे पारडी नागाजी घाट येथून काळी रेती चोरून हिंगणघाट शहरा कडे जाणाऱ्या रोड ने जात आहे अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी क्र 1 च्या ताब्यातील बिना क्रमांकाचा हिरवा रंगाच्या जॉन धिरे 5050 ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती( गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिडून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काडी रेती (गौन खनिज ) असा जु कि 7,57,000/- रु चा माल मिडून आल्याने , पो स्टे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला       

          सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जैन सा.अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित सा .यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे पथकतील .पोलीस हवालदार नरेंद्र डहाके ,पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे यांनी केली